By  
on  

भन्साळींना मिळाला प्रेमकथेसाठी नायक,19 वर्षांनंतर पुन्हा सलमान खानसोबत सिनेमा

पदमावत या ब्लॉकब्लस्टर सिनेमानंतर बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पुढच्या प्रोजेक्टची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. अनेक सेलिब्रिटींची नावे भन्साळी यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी चर्चेत होती. पण कुठल्याच नावावर त्यांच्याकडून अद्यापपर्यंत शिक्कामोर्तब झालं नाही. पण आता नुकतीच आश्चर्यकारक आणि आनंदाची बातमी हाती आली आहे, ती म्हणजे भन्साळींंच्या सिनेमात लवकरच त्यांचा १९ वर्षांपूर्वीचा नायक सलमान खान प्रमुख भूमिका साकारतोय आणि ही एक प्रेमकथाच असणार आहे.

‘हम दिल दे चुके सनम’ या १९९९ मध्ये आलेल्या भन्साळींच्या सिनेमात सलमान आणि ऐश्वर्यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. हा सिनेमा तेव्हा सुपरहिट ठरला होता. विशेष म्हणजे आजही हा सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहतात.  या सिनेमानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केल्याचं पाहायला मिळालं नाही

संजय लीला भन्साळी एका नव्या सिनेमाची निर्मिती करत असून त्यांच्या यामध्ये सलमान झळकणार आहे. या सिनेमाचं चित्रिकरण २०१९ मध्ये सुरु होणार असून पुढील वर्षी २०२० मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1099162646085922816

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive