By  
on  

लतादीदींना माझ्या कानशिलात लगावण्याचा संपूर्ण हक्क: अजय देवगण

अनिल कपूर, माधुरी दिक्षीत, अजय देवगण, रितेश देशमुख असे एकापेक्षा अनेक बडे कलाकार असलेला टोटल धमाल हा सिनेमा या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. धम्माल फ्रेंचायजीचा हा तिसरा सिनेमा आहे. सध्या रिक्रेएटेड गाण्यांचा ट्रेंड सुरु आहे. या सिनेमात मुंगडा या प्रसिध्द गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन पाहायला मिळतंय. सोनाक्षी सिन्हा या गाण्यावर थिरकली आहे. पण या गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन पाहून लता मंगेशकर मात्र चांगल्याच संतापल्या होत्या.तसंच यासाठी आमची कुठलीही परवानगी घेतली नाही असंही त्या म्हणाल्या होत्या.

लता दीदींनी या गाण्‍याबद्‍दल नाराजी दर्शवली आहे. नाराजीनंतर या टोटल धमाल सिनेमाचा प्रमुख अभिनेता अजय देवगणने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.  त्यांची ही नाराजी मला मान्यही आहे. त्यांच्या भावना मी समजू शकतो. मात्र त्यांना दुखाविण्याचा माझा किंवा माझ्या टीमचा कोणताच हेतू नव्हता. लताजी यांची  मी मनापासून माफी मागतो. जर लताजींना वाईट वाटले असेल तर त्‍या मला माझ्‍या कानशिलात लगावू शकतात.”, असं अजय म्हणाला.

दरम्यान, १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुंगडा’ या गाण्यामध्ये अभिनेत्री हेलन झळकली होती. उषा मंगेशकर यांचा स्वरसाज लाभला होता,

Recommended

PeepingMoon Exclusive