By  
on  

आईच्या पुण्यतिथी निमित्ताने जान्हवीने शेअर केला हा इमोशनल मेसेज, पाहा म्हणते ती

२४ फेब्रुवारी २०१८ला दुबईमध्ये श्रीदेवीचा मृत्यू ही प्रत्येकासाठी मन हेलावणारी बातमी होती. श्रीदेवी एक उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना, परिपूर्ण पत्नी आणि विशेष म्हणजे उत्तम आई होती. मोठी मुलगी जान्हवीचं करीअर सुरुवात होताना पाहण्याचं भाग्य तिला लाभलं नाही.

श्रीदेवीचं अकाली जाणं तिच्या कुटुंबियांसाठी सगळ्यात मोठा धक्का होता. बोनी कपूर आणि कुटुंबिय अजूनही या धक्क्यातून सावरले नाहीत. आज श्रीदेवीच्या पुण्यतिथीच्या मुहुर्तावर जान्हवीने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणते, ‘माझं मन कायमच दुखी राहिल, पण माझ्या चेह-यावर हास्य कायमच राहील. कारण या फोटोत माझ्यासोबत तू आहेस.’

https://www.instagram.com/p/BuOra4rn8L2/?utm_source=ig_web_copy_link

जान्हवीच्या या पोस्टमुळे नेटिझन्सनी श्रीदेवीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या मते, ती अजूनही आईच्या अपमृत्यूच्या धक्क्यातून सावरली नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive