By  
on  

कपिलच्या शोमध्ये दिसणार हे पाहुणे, पाहा काय काय धमाल केली यांनी

जवळपास एक वर्षानंतर छोट्या पडद्यावर परत आलेल्या ‘द कपिल शर्मा शो’ने पुन्हा आधीचा टीआरपी परत मिळवला आहे. या ना त्या कारणाने हा शो कायमच चर्चेत आहे. अनेकदा शोमध्ये आलेल्या पाहुण्यांमुळेही हा शो खास चर्चेत असतो. यावेळीही या शोमध्ये असेच खास पाहुणे येणार आहेत. हे आहेत १८८३च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या विजेत्या टीमचे सदस्य यावेळी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावणार आहेत.

https://www.instagram.com/p/BuOfQT8HeNM/?utm_source=ig_web_copy_link

सोनीने सोशल मिडिया अकाउंट्वर ही बातमी शेअर केली आहे. त्यासोबत कॅप्शन आहे, ‘आनंद, सन्मान आणि गर्वाची वेळ, या टीमने भारताला पहिला वर्ल्डकप दिला आहे. त्यावेळेचे अनुभव ऐका या कार्यक्रमात’. या एपिसोडमध्ये  कपिल देव, दिलीप वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, के श्रीकांत, रोजर बिन्नी, कीर्ति आजाद, मदन लाल, सैय्यद किरमानी, बलविंदर संधू, यशपाल शर्मा आणि सुनील वालसन हजेरी लावली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive