By  
on  

शाहरुख खानने शेअर केलं बिग बींच्या 'बदला'चं हे हटके पोस्टर

बिग बी आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या अफलातून अभिनयाच्या जुगलबंदीचा पिंकनंतर लवकरच बदला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सस्पेन्स क्राईम थ्रिलर सिनेमाचं आणखी एक हटके पोस्टर नुकतंच किंग खान शाहरुखने आपल्या ट्विटरवरुन शेअर केलं आहे. शाहरुख खान 'बदला'चा निर्माता आहे.

बदलाच्या या नवीन पोस्टरवर अमिताभ बच्चन रस्त्यावर उभे असलेले पाहायला मिळतायत तर कारमधून कोणीतरी त्यांच्यावर करडी नजर ठेऊन असलेलं पाहायला मिळतंय. शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये या पोस्टरसह हे पण लिहलंय, “जो दिखे वो सच हो और जो ना दिखे वो झूठ, ये हर बार ज़रूरी नहीं।’यावरुनच या थ्रीलर सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलीय.

https://twitter.com/iamsrk/status/1099890247071092736?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1099890247071092736&ref_url=https%3A%2F%2Fhindi.peepingmoon.com%2Fbollywood%2Fentertainment-news%2Fshahrukh-khan-shares-badla-new-poster-featuring-amitabh-bachchan-74218%2F

 

मर्डर मिस्ट्रीमध्ये अडकलेल्या तापसीला वाचवायला या सिनेमातही अमिताभ येणार आहेत. या सिनेमात अमिताभ एका वकिलाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. बादल गुप्ता असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. गेल्या ४० वर्षांत एकही केस न हरलेला वकील अशी बादल गुप्ता यांची ख्याती असते. हा सिनेमा  कहानी फेम सुजॉय घोष यांनी दिग्दर्शित केला आहे.

 

https://youtu.be/mSlgu8AQAd4

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांच्या बदलाचा 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive