By  
on  

मलायका-अर्जुनच्या नात्यावर देसी गर्ल काय म्हणाली, जाणून घ्या

आतापर्यंत करणच्या ‘कॉफी विथ करण’च्या या सीझनमध्ये आतापर्यंत अनेक कॉन्ट्राव्हर्सी समोर आली आहे. या चॅट शोमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी आपली आणि इतरांची गुपितं उघड केली आहेत. आता या शोमध्ये आणखी एका सेलिब्रिटीच्या नात्याच्या उलगडा झाला आहे.

https://www.instagram.com/p/BuRaznFHgNb/?utm_source=ig_web_copy_link

पीपिंगमूनच्या वृत्तानुसार करण या शोमध्ये लवकरच एक एपिसोड कॉफी अ‍ॅवार्डस म्हणून सादर केला जाणार आहे. या एपिसोडमध्ये होस्ट म्हणून मलायका अरोरा आणि किरण खेरही दिसून येत आहे. याशिवाय वीर दास आणि मल्लिका दुआ पण दिसेल. या चॅट शोच्या मागील एपिसोडमध्ये प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर आल्या होत्या.

https://www.instagram.com/p/BuQ8CKfgBM_/?utm_source=ig_web_copy_link

यावेळी अर्जुन आणि मलायकाच्या नात्याचा खुलासा झाला. करणने प्रियांकाला विचारलं की ‘वरुण धवन कुणाला डेट करतोय माहीत आहे का?’ त्यावर प्रियांका म्हटली की तिला केवळ अर्जून आणि मलायका डेटिंगबद्दलच माहिती आहे. त्यानंतर करणने हा प्रश्न करीनाला विचारला आणि करीनाने या प्रश्नाचा रोख बदलला. आता खुद्द प्रियांकाच्या तोंडून असा खुलासा झाल्याने  मलायका अर्जूनबद्दलच्या अफवांना पूर्णविराम मिळेल यात शंका नाही.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive