By  
on  

संजयलीला भन्साळीच्या आगामी सिनेमात ही जोडी कधी एकत्र दिसणार याची उत्सुकता

अभिनेत्री प्रियांका चोप्रा अलीकडेच ‘कॉफी विथ करण’च्या एपिसोड्समध्ये दिसली होती. तिच्यासोबत अभिनेत्री करीना कपूरही आहे. यावेळी दोघींमध्ये चांगलं बाँडिंग दिसलं. यावेळी करणने प्रियांकाला विचारलं की ती विशाल भारद्वाज किंवा संजयलीला भन्साळी यापैकी कोणासोबत काम करणं पसंत करेल. यावेळी तिने सांगितलं की दोघांसोबतही काम करायला आवडेल.

पण यापुर्वीच अशी बातमी आली होती की सलमान आणि संजयलीला भन्साळी एका लव्हस्टोरीसाठी एकत्र काम करू शकतात. या दोघांनी एकत्र ‘हम दिल दे चुके सनम’साठी १९ वर्षांपुर्वी एकत्र काम केलं होतं. आता भन्साळी प्रॉडक्शन हाऊसकडूनही अशा प्रकारची बोलणी चालू असल्याचं समोर आलं आहे. अशा वेळी सलमानसोबत प्रियांकाची जोडी जमेल असं यावेळी सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे रसिकांनाही ही जोडी खुप आवडली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive