By  
on  

कर्तिक, अनन्या आणि भूमीचा ‘पती, पत्नी और वो’ हा सिनेमा या दिवशी होणार रिलीज

कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर अभिनीत सिनेमा ‘पती पत्नी और वो’चे रिलीज डेट जाहीर झाली आहे. १९७८मधील मूळ सिनेमाचा हा सिनेमा रिमेक आहे. हा सिनेमा १० जानेवारी २०२० ला रिलीज होणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन संजीवकुमार यांचा रोल करताना दिसून येईल. टी-सिरीज आणि बी आर स्टुडिओ अलीकडेच ही बातमी जाहीर केली आहे. या सिनेमाच्या मूळ भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या रिमेकच्या दिग्दर्शनाची धुरा मुदस्सर अजीजकडे आहे. या सिनेमाला मॉडर्न टच देण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive