By  
on  

या कारणासाठी तैमूर फोटोग्राफर्सना देतो प्रतिक्रीया : करिना कपूर

आज सेलिब्रिटींपेक्षा त्यांची मुलंच जास्त चर्चेत असतात. स्टार किड्स नेहमीच लाईमलाइटमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे करिना कपूर आणि सैफ अली खान या स्टार कपलचा लाडका तैमूर अली खान. नुकतीच कॉफी विथ करणच्या शोमध्येकरिना कपूर  ही देसी गर्ल प्रियांका चोप्रासोबत आली होती, तेव्हा दोघींच्या करणसोबत धम्माल गप्पा रंगल्या. यावेळी करिना तैमूरबद्दल खुप गोष्टी सांगत होती.

करिना कपूर म्हणते, "तैमूर अजून खुप लहान आहे. त्याचे हे खेळण्या-बागडण्याचे दिवस आहेत. पण तो सर्वात जास्त फोटोग्राफर्सच्या गराड्यात असतो. तो जिथे जातो तिथे कॅमेरा त्याचा पाठलाग करतो. याची मला कधी कधी भीती वाटते. इतकी जास्त लाईमलाईट चांगली नाही. त्याचं बालपण कुठे हरवायला नको."

याबाबत करिना पुढे अजून स्पष्ट करते, "तैमूर पॅपाराझींचा खुप लाडका आहे. त्यांना त्याचे फोटो काढायला खुप आवडतात. त्यामुळे ते तैमूरचे मित्रच झाले आहेत आणि तैमूर पण खुप फ्रेंडली मुलगा आहे. त्यामुळे ते जेव्हा त्याला हाक मारतात, तेव्हा तो लगेच त्यांना हात हलवून प्रतिक्रीया देतो."

https://twitter.com/StarWorldIndia/status/1099704392914210817

Recommended

PeepingMoon Exclusive