By  
on  

तनुश्री दत्ता लैगिक शोषणावर बनवणार शॉर्ट फिल्म; तरुणींना दाखवणार दिशा

बॉलिवूडमध्ये मी टू नावाचं वादळ वणव्यासारखं पसरवणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता अचानक प्रकाशझोतात आली. 2008 साली हॉर्न ओके सिनेमाच्या शूटींगदरम्यान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत असभ्य वर्तवणुक केल्याचा आरोप केला. त्यावरुन बराच वादंग उठला. त्यानंतर जणू काही इंडस्ट्रीत याची लाटच आली.अनेक महिला कलाकार पुढे येऊन आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तवणुकीबद्दल त्यांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरुन आवाज उठवला आणि भल्याभल्यांचे खरे चेहरे जगासमोर आले.

आता तनुश्री बॉलिवूडमधल्या लैंगिक शोषणाचं विदारक वास्तव लघुपटातून प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे.बॉलिवूडमध्ये ज्यांचं कोणीच नसतं पण अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देऊ शकत नाही अशा होतकरू नवीन अभिनेत्रींना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं म्हणूनच या दुनियेचं भीषण वास्तव ती या लघुपटात मांडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा 8 मार्च रोजी महिला दिनी तनुश्रीचा हा लघुपट प्रदर्शित होत आहे.

तबिबल 9 वर्षानंतर कॅमे-यासमोर सामोरी जाणारी तनुश्री दत्ता या शॉर्टफिल्मसाठी खुप उत्साही आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive