‘केसरी’मधील पहिलं गाणं रिलीज, ‘सानु केहंदी’मध्ये दिसली यारी-दोस्तीची झलक

By  
on  

अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘केसरी’ सिनेमातील ‘सानु केहंदी’ हे नवीन गाणं आज रिलीज झालं आहे. या गाण्यात अक्षय आणि त्याच्या मित्रांमधील बाँडिंग दिसून येत आहे. या गाण्याला तनिष्क बागची ने कंपोज केलं आहे. रोमी आणि बृजेश शांडिल्य यांनी हे गाणं गायलं आहे.

या गाण्यात सिनेमातील २१ शिपायांमधील एकमेकांशी असलेलं बाँडिंग दिसून येत आहे. सारागढीच्या किल्ल्यावर मिळालेल्या निवांत क्षणी हे सैनिक मजा-मस्ती करताना दिसत आहेत. पंजाबी लोकसंगीताचा फिल या गाण्याने साधला आहे. या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केलेली आहे. केवळ तीन दिवसात या गाण्याचं शुटिंग पूर्ण झालं.

अक्षय कुमार स्टारर ‘केसरी’ धर्मा प्रॉडक्शनचा सिनेमा आहे. सारागढी लढाईच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर हा सिनेमा बेतला आहे. परिणीती चोप्राही या सिनेमात दिसून येत आहे. हा सिनेमा २१ मार्चला रिलीज होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=PtCJm7uMcf0

Recommended

Loading...
Share