रणवीरने करीनाकडे मागितल्या या टीप्स, करीनाने दिले हे उत्तर

By  
on  

करीना सतत प्रसिद्धीच्या शिखरावर यावर कुणाचं दुमत नसावं. तिचा एक रेडिओ शो देखील रसिकांकडून पसंत केला जात आहे. या शो वर मलायकाही काही दिवसांपूर्वी हजेरी लावून गेली. अलीकडेच रणवीरही या शोमध्ये आला होता.

https://twitter.com/DeepVeer_FC/status/1100731689104560128

या शोमध्ये करीनाकडून रणवीरने काही खास टिप्स मागितल्या. रणवीरने करीनाला विचारलं की एक परफेक्ट पती बनण्यासाठी काय करायला हवं. यावर करीना म्हणते की, ‘रणवीर सगळ्या देशाला माहीत आहे की तू दीपिकावर किती प्रेम करतोस ते. तुला कोणत्याही टीप्सची गरज नाही. तुझं दीपिकावरचं प्रेम पाहताना आम्हालाही छान वाटतं.’

https://www.instagram.com/p/Bqum9mKgab9/?utm_source=ig_web_copy_link

या शोमध्ये रणवीर करीना आणि त्याच्या आगामी तख्तबद्दलही बोलले. तख्त हा एक ऐतिहासिक सिनेमा आहे. याचं दिग्दर्शन करण जोहर करत आहे. या सिनेमात आलिया भट्ट, अनिल कपूर, विक्की कौशल, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका आहेत.

Recommended

Loading...
Share