By  
on  

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत'मध्ये सोनाली कुलकर्णी, ट्वीट करून मानले आभार

मराठी कलाकार कोणत्याही माध्यमात कोणत्याही भाषेतील सिनेमात स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण करतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही त्याला अपवाद नाही. सोनालीने आजवर अनेक मराठी आणि अमराठी सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

https://twitter.com/sonalikulkarni/status/1102220505971449857

सध्या ती सलमान खानच्या बहुचर्चित ‘भारत’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिने या संबंधी ट्वीट करून दिग्दर्शकाचे आभार मानले आहेत. ‘भारत’ सिनेमा हा 2014 साली आलेल्या एका कोरियन सिनेमा ‘अ‍ॅन ऑड टु माय फादर’चा अधिकृत अ‍ॅडप्शन आहे. यात सलमान आणि कतरिनासोबतच दिशा पटानी, तबू , जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी आणि नोरा फतेही यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. २०१९च्या ईददिवशी सलमानचा भारत रसिकांच्या भेटीला येत आहे. सलमान या सिनेमामध्येही अ‍ॅक्शनची धमाल असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्याही या सिनेमाकडून अपेक्षा वाढतील यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive