कुंभमेळ्यात उजळलं ड्रोनने आकाश, ‘ब्रम्हास्त्र’चा लोगो झाला लाँच

By  
on  

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र या सिनेमाची चर्चा त्याच्या निर्मितीपासूनच आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट आहेत. या सिनेमापासूनच बॉलिवूड्च्या सिझलिंग कपल आलिया-रणवीरच्या नात्याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या.

आता हा सिनेमा पडद्यावर कधी येणार याचे वेध चाहत्यांना लागले आहेत.  त्यामुळेच ‘ब्रम्हास्त्र’च्या मेकर्सनीही या सिनेमाचा पहिला लूक आज रिलीज करण्याचं ठरवलं होतं. पण या सिनेमाचा लोगो आज लाँच केला गेला. या लोगोच्या लाँचसाठी पहिल्यांदाच हटके ट्रीक ट्राय केली गेली.

या सिनेमाचा लोगो लाँच करण्यासाठी कुंभमेळा आणि महाशिवरात्रीचा योग जुळून आला. यासाठी सिनेमाची टीम प्रयागराज इथे पोहोचली होती. या लाँचसाठी जवळपास १५० ड्रोन वापरले आहे. या ड्रोननी आकाशात पहिल्यांदा भारताचा झेंडा बनवला. त्यानंतर ब्रम्हास्त्राचा लोगो बनवला गेला आणि त्यानंतर नाव. या क्षणाचा फोटो अयानने इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. यासोबत रणवीर आणि आलियाचं सिनेमातील नावही रिव्हील केलं आहे.

शिवा अणि इशा असं या दोघांचं या सिनेमातील नाव आहे. आता या सिनेमाचा टीझर कधी येतोय याची उत्सुकता रसिकांना लागली आहे.

Recommended

Share