By  
on  

सुपरकॉप अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'चा पाहा हा फर्स्ट लूक

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार लवकरच एका नव्या भूमिकेत आणि लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येतोय. पोलिसपटांचा राजा म्हणून प्रसिध्द असलेला दिग्दर्शक रोहित शेट्टी सिंघम आणि सिंबा या ब्लॉकबस्टरनंतर आगामी 'सूर्यवंशी' सिनेमा घेऊन येतोय. अभिनेता अक्षय कुमार हा 'सूर्यवंशी' सिनेमात सुपरकॉप नायक साकारतोय. या बहुचर्चित सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मिडीयावर करण जोहरने उलगडलाय.

प्रसिध्द निर्माता करण जोहरने 'सूर्यवंशी'च्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. त्यामुळेच करण जोहर, रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार हे जबरदस्त समिकरण या सिनेमा निमित्ताने प्रथमच एकत्र येत आहेत. 'सूर्यवंशी' हा सिनेमा ईद 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाच्या शूटींगला यंदा मे महिन्यात सुरुवात होईल.

https://twitter.com/karanjohar/status/1102775491398959105

जर तुम्ही सिंबा सिनेमा पाहिला असेल, तर तुम्हाला हे नक्कीच माहित असणार की त्या सिनेमाच्या क्ल्यायमॅक्समध्ये अक्षय कुमार एटीएस चीफ 'सूर्यवंशी' म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसंच या सिनेमाच्या फोटोशूटची बातमी पिपींगमूनने यापूर्वी दिली होती. या खास फोटोशूटसाठी गोव्यात असलेला रोहित वेळ काढून मुंबईत आला. यशराज स्टुडिओजमध्ये हे फोटोशूट पार पडलं होतं.

https://twitter.com/karanjohar/status/1102774499592683521

Recommended

PeepingMoon Exclusive