खिलाडी अक्षय कुमारचा हा ‘धगधगता’ अवतार पाहिलात का? स्टेजवर अशी घेतली एंट्री

By  
on  

बॉलिवूडमध्ये थरारक अ‍ॅक्शन सीन लीलया करणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमारचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. त्याच्या फॅन्सनाही सरप्राईज देण्यासाठी अक्षय अनेकदा स्टंट्सचाच आसरा घेतो. अक्षयने आताही असाच थक्क करणारा स्टंट करून अक्षयने उपस्थितांना आश्चर्यचकित करून सोडले आहे.

https://twitter.com/PeepingMoon/status/1102918912474210304

महालक्ष्मी रेस कोर्सच्या टर्फ क्लबमध्ये प्राईम ओरिजिनल सिरीजची घोषणा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्याने अनोखा आणि थरारक स्टंट सादर केला.

‘केसरी’ सिनेमातील त्याच्या व्यक्तिरेखेप्रमाणे आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या अवस्थेत स्टेजवर चालत आला. त्याच्या या अवताराला बघून उपस्थित प्रत्येकजण मात्र थक्क झाला.

Recommended

Share