By  
on  

सलमान खानसोबतचा हा फोटो शेअर करत कतरिना म्हणते ..

सलमान आणि कतरिना या जोडीबद्दल सर्वांनाच नेहमी कुतुहूल वाटत आलं आहे. या जोडीचे सिनेमे असोत किंवा मग त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री. त्यांच्याबद्दल चर्चांना नेहमीच उधाण येतं. सलमान आणि कतरिना ही लाडकी जोडी ब-याच दिवसांनी 'भारत'मध्ये झळकतेय हे आपल्याला माहितच आहे. पण नुकताच कतरिनाने सलमानसोबतचा एक खुपच सुंदर असा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि ह्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव पडला.

इन्स्टाग्रामवर सलमान खानसोबतचा फोटो पोस्ट करत कतरिना म्हणते,"आणि अशाप्रकारे 'भारत' सिनेमाचं शूटींग रॅप अप झालं आहे. या अप्रतिम टीमसोबत काम करताना खुप मज्जा आली. फार उत्कंठावर्धक व्यक्तिरेखा मला या सिनेमानिमित्ताने साकारायला मिळतेय, यासाठी मी अली अब्बास जफर, सलमान खान,अतुल अग्निहोत्री आणि अलविरा खानचे खुप खुप आभार मानते."

सूत्रांच्या माहितीनुसार, 'भारत'साठी 2 मार्च रोजी सलमान-कतरिना यांनी काही खास सीन्ससुध्दा शूट केले आणि त्यानंतर आता सिनेमा रॅप अपची घोषणा करण्यात आली.

https://www.instagram.com/p/BunbewGgZee/?utm_source=ig_embed

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘भारत’ सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे असून अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात जॅकी श्रॉफ, तब्बू, दिशा पटानी, सोनाली कुलकर्णी हेसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

https://youtu.be/Fxq18WuuRms

Recommended

PeepingMoon Exclusive