By  
on  

पाहा इरफान खान खेळतोय लुका छुपी; मुंबई विमानतळावर झाला स्पॉट

दुर्धर कॅन्सरने पिडीत बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता इरफान खान यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि तो पुन्हा सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस यावा अशी चाहत्यांची खुप इच्छा आहे. पण ती कधी प्रत्यक्षात येणार हे अजून माहित नाही. फेब्रुवारी महिन्यात इरफान भारतात परतल्याच्या चर्चा होत्या. पण त्याच्या सिनेमांबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालं नाही. महत्त्वाचं म्हणजे चक्क आज सकाळी मुंबई विमानतळावर इरफान स्पॉट झाला. पण फोटोग्राफर्सने त्याचे फोटो काढू नयेत यासाठी  इरफानने त्याचा चेहरा झाकला होता. फोटोग्राफर्सनासुध्दा त्याने फोटो काढून देण्यास मनाई केली.

यावेळी इरफानने पांढऱ्या रंगाचा शर्ट, कॅमोफ्लेग पँट आणि त्यावर गुलाबी रंगाचा कोट घातलेला होता. तसेच त्याने एक छानशी हॅट घातली होती.

https://www.instagram.com/p/Buxo0-EACLB/?utm_source=ig_web_copy_link

हिंदी मिडीयमच्या सिक्वलमध्ये इरफान काम करणार असल्याचं बोललं जात ाहे. पण अद्याप या सिनेमाबाबतच्या कुठल्याच हालचाली सुरु झालेल्या नाहीत

Recommended

PeepingMoon Exclusive