By  
on  

ब-याच वर्षांनी बिग बी आणि शाहरुख खान एकत्र झळकणार?

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान ही जोडी अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. दोघांच्याही अभिनयाची जुगलबंदी पाहणं म्हणजे सिनेरसिकांसाठी एक पर्वणीच ठरते. पण बदला सिनेमाच्या निमित्ताने दोघंही कलाकार एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाले. कारण बदला सिनेमाची निर्मिती शाहरुख खानने केली आहे. तर अमिताभ ह्यात मुख्य भूमिका साकारतायत. त्यामुळे निर्माता आभिनेता अशी ही जोडगोळी जमली होती.

बदला सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनाही तो खुप भावला आहे. सर्वत्र या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळतोय. अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाच्या प्रशंसेचे अनेक पोस्टर शेअर करत, अमिताभ यांनी एक जबरदस्त कॅप्शन दिलं आहे. अमिताभ म्हणतात, आता हा सिनेमा तर झाला आता नोकरी कुठे, मागच्या 50 वर्षांपासून मी हेच विचारत आलोय.

https://twitter.com/SrBachchan/status/1104107270588133376

बिग बींच्या या प्रश्नावर बदलाचा निर्माता शाहरुख खान म्हणतोय, सर तुम्हाला जर नोकरी मिळाली तर मला पण तिथे रेकमेंड करा. तर ह्यावर बिग बींनी पुन्हा हसून उत्तर दिलंय. "हा हा हा, सर एकत्र काम करुयात माझ्याकडे एक आयडिया पण आहे."

https://twitter.com/SrBachchan/status/1104259321792102402

अमितभ बच्चन आणि शाहरुख खान ह्यांचं हे संभाषण नक्कीच त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टकडे इशारा करतायत, एवढं मात्र नक्की!

Recommended

PeepingMoon Exclusive