By  
on  

'लव आजकल 2' च्या सेटवरुन सारा आणि कार्तिकचा हा पहिला फोटो

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या जोडीचा पहिला वहिला सिनेमा 'लव आजकल 2' या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे.या सिनेमाबाबतची महत्त्वाची बातमी म्हणजे  या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली असून ह्या सिनेमाच्या सेटवरुन या दोघांना नुकतंच स्पॉट करण्यात आलं आहे. या सेटवरचा दोघांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय.

साराने कार्तिकसोबत आपल्याला कॉफी डेटवर जायला आवडेल, अशी इच्छा सर्वप्रथम कॉफी विथ करणच्या शोमध्ये वडील सैफ अली खानसमोर व्यक्त केली होती. त्यानंतर सारा आणि कार्तिकचं हे कॉफी प्रकरण माध्यमांनी चांगलंच उचलून धरलं.

य. प्रसिध्द दिग्दर्शक इम्तियाज अली सारा आणि कार्तिक या जोडीसोबत लवकरच एक सिनेमा घेऊन येतायत. ही एक लव्हस्टोरी असेल.  या सिनेमात या दोघांसोबत अभिनेता रणदीप हुड्डा पण असेल.

सूत्रांच्या माहितीनुसार,काही दिवसांपूर्वीच  कार्तिक, सारा आणि रणदीप हुडा हे सिनेमाची स्क्रिप्ट वाचन करत असून लवकरच हा सिनेमा फ्लोअरवर जाणार असल्याची माहिती मिळाली होती.

https://www.instagram.com/p/Bu1DFuHgXzb/?utm_source=ig_embed

Recommended

PeepingMoon Exclusive