By  
on  

पाहा करण जोहरच्या मल्टिस्टारर 'कलंक'चा हा भारावून टाकणारा टीझर

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या मल्टीस्टारर 'कलंक'चा बहुप्रतिक्षीत टीझर अखेर आज प्रदर्शित झाला. हा टीझर पाहून सिनेमाबाबतची उत्कंठा आता आणखी शिगेला पोहचलीय. सिनेमातील कलाकारांची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर उलगडण्यात आली होती. माधुरी दीक्षित, संजय दत्त, वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर  ही तगडी स्टारकास्ट सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. एका अव्यक्त प्रेमाची ही कहाणी असल्याचं टीझर पाहून समजतंय. हा एक भलामोठा बिग बजेट सिनेमा असल्याने सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत.

एका अमर प्रेमाची 'कलंक' ही कहाणी आहे. नेहमीसाखीच दोन दुरावलेल्या प्रेमवीरांची ही काहीशी कथा आणि त्यांच्यासमोर येणारी असंख्य संकंट, त्यांच्याशी त्यांचा होणारा सामना व यातूनचं घडणारं नाट्य असा हा बॉलिवूड मसाला असलेला सिनेमा 1940 दरम्यानच्या काळात घडतो.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला मल्टीस्टारर 'कलंक'  येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

https://twitter.com/karanjohar/status/1105370596085424128

रण जोहरचा आगामी सिनेमा ‘कलंक’ या वर्षीच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive