आदित्य ठाकरे आणि या अभिनेत्रीची लंच डेट; फोटो झाला व्हायरल

By  
on  

सध्या कधी कोण कुणासोबत स्पॉट होईल सांगता येत नाही. पण प्रसिध्दी माध्यमं मात्र त्यांना चांगलंच कॅमे-यात कैद करतात आणि मग ते सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतात. असंच काहीसं नुकतंच शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत घडलंय. आदित्य ठाकरे हे नेहमीच मनोरंजन आणि बॉलिवूड विश्वाशी जोडलेले असल्याचं आपण पाहिलंय. पण नुकताच त्यांचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय आणि तो पाहून तुम्हालासुध्दा आश्चर्याचा धक्का बसेल.

अभिनेत्री दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांचा रविवारच्या लंच डेटचा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय. तसंच या लंच डेटमुळे त्यांच्यातील घनिष्ट मैत्रीची चर्चा आता माध्यमांमध्ये रंगू लागली आहे. ‘धोनी’ आणि 'बागी 2' सिनेमांमुळे प्रकाश झोतात आलेली दिशा पटानी हिचं नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडलं गेलं होतं. पण त्यांच्याकडून नात्याचा कधीच स्विकार करण्यात आलेला नाही.

फक्त एकमेकांचे चांगले मित्र म्हणून की आणखी काही किंवा एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी तर या दोघांची ही लंच डेट नव्हती ना, हे चित्र लवकरच स्पष्ट होईलच.

Recommended

Share