By  
on  

म्हणून हा सिनेमा अक्षय कुमारच्या खुप जवळचा आहे

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतील एक संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. सिनेमातला तो जसा आघाडीचा हिरो आहे. तसा ख-या आयुष्यातसुध्दा तो हिरोचं आहे. कधी भारतीय जवानांना स्वखुशीने मदत म्हणून त्याचा भारत के वीर अॅप असो तर कधी परळीतील सामूहिक विवाह केलेल्या जोडप्यांना त्याने भेट म्हणून दिलेला एक लाखाचा धनादेश असो, अक्षय आपलं सामाजिक भान कधीच विसरत नाही. पण नुकताच हा हरहुन्नरी अभिनेता एका मुलाखती दरम्यान खुपच भावूक झाला आणि यामागचं कारण जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली.

अक्षय कुमारचा 'केसरी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यानिमित्ताने तो एका मुलाखतीसाठी निमंत्रित होता. बोलता बोलता त्याने वक्त सिनेमाचा विषय काढला आणि खुपच भावूक झाला. अक्षय म्हणतो," 'वक्त- रेस अगेन्स्ट टाईम' हा सिनेमा माझ्या खुप जवळचा  आहे. या सिनेमाचं शुटींग करताना त्यातील प्रसंग आणि माझ्या वैयक्तिक जीवनातील कठीण  काळ एकसारखाच होता. माझे वडील कॅन्सरशी झुंज देत होते आणि माझे ऑनस्क्रीन वडील अमिताभ बच्चन यांनासुध्दा या सिनेमात कॅन्सर आहे. जर तुम्ही या सिनेमाचे सीन्स पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की ते किती खरेखुरे प्रसंग वाटतायत. कधी कधी मी इतका भावूक व्हायचो की स्वत:ला आवरताच यायचं नाही."

सारागढीच्या युध्दावर आधारित अक्षय कुमारचा बहुचर्चित 'केसरी' येत्या 21 मार्चला प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive