मलायका आणि अर्जुन एप्रिलमध्ये ख्रिश्चन पध्दतीने अडकणार विवाहबंधनात ?

By  
on  

मलायका आणि अर्जुन ह्यांचं प्रेमप्रकरण आता काही नवीन राहिलेलं नाही. इंडस्ट्रीतील प्रत्येकाला त्यांच्या नात्याची आता चांगलीच कल्पना आली आहे. अनेक बॉलिवूड पार्ट्या असोत किंवा दोघांपैकी एकाचे कौटुंबिक सोहळे नेहमीच ते एकत्र स्पॉट होतात. काही दिवसांपूर्वीच हे दोघं येत्या एप्रिलमध्ये पारंपारिक ख्रिश्चन पध्दतीने लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त होते. पण आत्ता ही शक्यता आणखी बळावलीय.

एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार,अर्जुन -मलायका हे हॉट कपल एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात ख्रिश्चन पध्दतीने अगदी खासगी सोहळ्यात विवाहबध्द होणार आहेत. या लग्नाच्या तयारीचं फर्मान दोघांनी आपापल्या टीमला दिलेलं आहे. तसंच या लग्नासाठी फक्त दोघांच्याही जवळचे नातेवाईक आणि काही मोजकाच मित्रपरिवार उपस्थित असेल.

तुम्हाला हे माहितच असेल का, दोन दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत मलायकाने आपण अर्जुन कपूरसोबत ख्रिश्चन पध्दतीने विवाहबध्द होणार असल्याच्या बातम्यांना अफवा म्हटलं होतं. आता नेमकं खरं काय आणि अफवा काय हे येणारा काळ स्पष्ट करेलच.

Recommended

Share