दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने या मुलाला घेतले दत्तक

By  
on  

बॉलिवूडची सुपरकूल जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. सुखाचा संसार सुरु आहे. सर्वसामान्यांप्रमाणे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या रील आणि रिअल लाईफ सुपरहिट जोडीकडून गोड बातमी कधी मिळणार ते. पण इथे जरा वेगळंच प्रकरण घडतंय. नुकतंच दीपिका-रणवीर हे दोघेही दत्तक पालक झाले आहेत. आणि त्यांचं हे मूल म्हणजे दुसरं तिसरं कोणी  नसून तुमचा आवडता बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरुण धवन आहे.  इतका गोड मुलगा आपल्याला लाभल्याने दीपिका आणि रणवीर धन्य झाले आहेत.

वरुण धवनसोबत दीप-वीरचा एक सेल्फी व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत वरुण आपली दत्तक आई दीपिका आपली किती काळजी घेतेय हे सांगताना दिसतोय. हा मजेशीर व्हिडिओ दीपिका, रणवीर आणि वरुणच्या चाहत्यांना भलताच आवडलेला दिसतोय. कारण,  प्रवासात जसा जमेल तसा काढलेला हा धम्माल व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झालाय.

https://www.instagram.com/p/Bu8ZgZDAkLU/?utm_source=ig_embed

 

तुम्हाला माहितच असेल की, आकाश अंबानीच्या रिसेपश्नला वरुणचे आई वडील म्हणजेच डेव्हिड धवन आणि त्यांच्या पत्नी यांनी वरुणची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत हजेरी लावली होती. त्यामुळे आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन गेल्यामुळे वरुणचा खुप जळफळाट झाला होता. पण तो लाडिक राग होता हे तुम्हालासुध्दा माहितीय. यंदा वरुण आणि नताशा विवाहबध्द होणार असल्याच्या जोरदार चर्चा प्रसिध्दी माध्यमांमध्ये सुरु आहेत.

Recommended

Share