सैफ अली खानने या बहुप्रतिक्षीत सिनेमातील गाण्याचं शूटींग केलं पूर्ण

By  
on  

अभिनेता अजय देवगण आणि सैफ अली खान ह्यांच्या अभिनयाची जुगलबंदी ब-याच काळानंतर पाहायला मिळणार आहे. अजय देवगणचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिनेमा ‘तानाजी – द अनंसंग वॉरियर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात अजयसोबतच सैफसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतोय.

एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘तानाजी– द अनंसंग वॉरियर’ या सिनेमात काजोल आणि अजय देवगण एकत्र झळकणार आहेत. तसंच या सिनेमाची शुटींगसुध्दा सुरु आहे. या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सैफने या सिनेमातील एका गाण्याचं शुटींगसुध्दा पार पाडलं आहेत. महत्त्वाचं म्हणजे सैफची या सिनेमातील ही खलनायकाची भूमिका असेल असंही ह्या बातमीत म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/BmHuFtvgJgl/

‘ओमकारा’ सिनेमानंतर तब्बल 13  वर्षांनी अजय देवगण आणि सैफ अली खान सिनेमात एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांना पाहण्याची प्रचंड घाई झाली आहे.

Recommended

Share