'सायना नेहवाल' बायोपिकमधून श्रध्दा कपूर आऊट, परिणीती चोप्रा इन

By  
on  

आज बायोपिक सिनेमांचा नवा ट्रेंड बॉलिवूडमध्ये रुजू झाला आहे. जणू काही या सिनेमांची लाटच वाहतेय. एकामागून एक बायोपिक प्रदर्शित होताना पाहायला मिळतायत. प्रेक्षकांनाही एखाद्या व्यक्तीचा संघर्षमय प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला आवडतो. मग तो राजकारण असो, सांस्कृतिक किंवा क्रीडा प्रत्येक क्षेत्रातील यशोशिखरावर असलेल्या व्यक्तीचा बायोपिक येणं हे काही  आता नवीन राहिलेलं नाही.

अनेक महिन्यांपासून तुम्हाला हे माहितच असेल  की, भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येतोय आणि यात सायनाची व्यक्तिरेखा श्रध्दा साकारतेय. काही महिन्यांपूर्वीच श्रध्दाचा या सिनेमातील फर्स्ट लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. ह्यात ती हुबेहूब सायना नेहवालसारखीच दिसत होती. तसंच यासाठी बॅडमिंटनचं ती प्रशिक्षणही घेत होती, परंतु आता श्रध्दानेच या सिनेमातून काढता पाय घेतला आहे आणि परिणीती चोप्राची सायना नेहवाल म्हणून सिनेमात वर्णी लागलीय.

https://www.instagram.com/p/BoS5U98lEa_/?utm_source=ig_embed

एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, श्रध्दा कपूरचे यंदा अनेक सिनेमे एकामागोमाग एक प्रदर्शित होत आहेत त्यामुळे सायना नेहवाल बायोपिकसाठी अजिबातच वेळ नसल्याने तिने हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच परिणीतीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असून निर्माते भूषण कुमार यांनीसुध्दा या बातमीला दुजोरा दिलाय.

Recommended

Loading...
Share