भावनिक करणारं ‘केसरी’मधलं ‘तेरी मिट्टी’ हे गाणं रिलीज, दिसली देशभक्ती

By  
on  

अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘केसरी’ची चर्चा रिलीज़ पूर्वीपासून आहे. या सिनेमाच्या धमाकेदार ट्रेलरने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती खुप आधीच मिळवली आहे. या सिनेमातील गाणीही रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सिनेमातील नवं कोरं गाणं नुकतंच समोर आलं आहे. ‘तेरी मिट्टी’ नावाचं हे गाणं देशभक्तीने ओतप्रोत भरलेलं आहे. शिखांच्या पराक्रमाचा प्रत्यय या गाण्यातून अनुभवास येतो. या गाण्यात अक्षय, परिणीतीसह प्रत्येकजण मातृभूमीच्या प्रेमात हरवलेला दिसून येत आहे. ‘केसरी’ सिनेमा 1897 साली झालेल्या सारागढी युध्दावर आधारीत आहे. शीखांनी आपल्या मोजक्याच तुकडीच्या सैन्याच्या जोरावर हजारो अफगाणी सैनिकांना सळो की पळो करुन सोडलं होतं. २१ मार्चला ‘केसरी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्याचे बोल मनोज मुन्तशीर यांनी लिहिले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=wF_B_aagLfI

Recommended

Loading...
Share