पगडी घातल्यावर नसानसात अभिमान जाणवायला लागतो : अक्षय कुमार

By  
on  

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘केसरी’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सिनेमात त्याच्यासोबत परिणीती चोप्राही दिसणार आहे. या प्रसंगी अक्षयने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी अक्षयला अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एक होता पगडीबद्दल. या सिनेमात अक्षयने भलीमोठी पगडी घातलेली दिसून येत आहे. याविषयी बोलताना अक्षय म्हणतो, ‘मी जेव्हा पगडी बांधतो, त्यावेळी माझ्या मनात अभिमान दाटून येत असतो. वागण्या-बोलण्यात एक वेगळी चमक येते. पगडी बांधल्याने डोक्याला भार वाटतो पण मनात एक जबाबदारीची जाणीवही निर्माण होत असते. १२२ वर्षांपूर्वी २१ शिखांनी दहा हजार अफगाणी आक्रमकांना नमवलं होतं. केसरी ही त्यांची गोष्ट आहे. हा सिनेमा २१ मार्च २०१९ मध्ये रिलीज होत आहे.

https://twitter.com/PeepingMoon/status/1106503091447173121

Recommended

Loading...
Share