अक्षय कुमारने बीएसएफच्या महिला सैनिकाबरोबर केले दोन हात, व्हिडियो झाला व्हायरल

By  
on  

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या सैन्याविषयी असलेल्या प्रेमासाठी ओळखला जातो. अक्षयने पुलवामा हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या सैनिकांसाठी ५ कोटी रुपयांची मदतही केली होती. याशिवाय अक्षयने अलीकडेच मुलींसाठी आत्मरक्षा प्रशिक्षण आयोजित केलं होतं. अक्षयने अलीकडेच एक व्हिडियो शेअर केला आहे. यात तो बीएसएफच्या महिला सैनिकाबरोबर बॉक्सिंगचं कौशल्य आजमावताना दिसत आहे. या व्हिडीयोला कॅप्शन देताना अक्षय म्हणतो, ‘बीएसएफच्या जवानांना भेटण माझ्यासाठी जणू मेजवानीच असते. त्यांचा उत्साह आणि ज़िंदादिली माझ्यासाठी प्रेरणा आहे.’ अक्षय सध्या केसरीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. केसरी २१ मार्च ला रीलीज होत आहे.

https://www.instagram.com/p/BvL-kqUHHkJ/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

Share