धगधगत्या देशभक्तीची साहसपूर्ण गोष्ट : केसरी

By  
on  

अक्षय कुमारच्या केसरी या सिनेमाची चर्चा रिलीज़पूर्वीपासूनच आहे. हा सिनेमा शिखांच्या सारागढ़ी येथील लढाईवर बेतलेला आहे. अक्षय स्वत: या सिनेमाबाबत खुपच एक्साईटेड आहे. तो केसरीच्या टीमसोबत किंवा त्याच्या या लूकचे फोटो शेअर करत असतो.अक्षयसोबत या सिनेमात परिणीती चोप्रा दिसणार आहे. या सिनेमात २१ शीख सैनिकांनी १००० अफ़ग़ाणी सैनिकांना नमवलं होतं. अक्षय या सिनेमात हवालदार ईशरसिंगची व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेसाठी त्याने खास घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं आहे.

हे युद्ध १२ सप्टेंबर १८९७मध्ये लढलं गेलं होतं. इतिहासातील मोठया लढायांपैकी एक असलेल्या या लढाईचा स्मृतिदिन ब्रिटनमध्येही साजरा केला जातो. पण भारतात याची दख़ल आता घेतली गेल्याचंही अक्षय नमूद करतो. अक्षय कुमार हा करण जोहरसोबत मिळून या सिनेमाची निर्मिती करत आहेत. हा बिग बजेट सिनेमा असल्याचं बोललं जात असून या सिनेमाच्या ग्राफीक्सवरसुध्दा बरेच पैसे खर्च करण्यात आले आहेत.

सारागढी या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे. कारण या ठिकाणाचं असलेलं राजकीय महत्त्व. या ठिकाणाहून अफ़ग़ाणी सैनिकांना भारतात प्रवेश करण सहज शक्य व्हायचं. पण शीखांच्या कडव्या प्रतिकाराने हे शक्य झालं नाही. हिच लढाई सारागढीची लढाई म्हनूण ओळखलं जातं. हे ठिकाण आता पाकिस्तानात आहे.

Recommended

Loading...
Share