‘छपाक’च्या रिडिंग सेशनला सुरुवात, दीपिकाने शेअर केला फोटो

By  
on  

दीपिका पदुकोण सध्या लग्नानंतरच्या पहिल्या सिनेमाच्या शुटिंग सेशनमध्ये व्यस्त झाली आहे. ती मेघना गुलजारच्या छपाकमधून रसिकांच्या समोर येत आहे. शुटिंगला सुरुवात करण्यासाठी तिने आणि सहकलाकार विक्रांत मेस्सीने ‘छपाक’चं रिडींग सेशन अटेंड केलं.

https://www.instagram.com/p/BvOV0gsAV5f/?utm_source=ig_web_copy_link

हा फोटो शेअर करताना दीपिका म्हणते, ‘सगळी तयारी झाली आहे, फक्त आता डोकं विल्यम शेक्सपिअर सारखं चालायला हवं.’ दीपिका ‘छपाक’ची केवळ नायिकाच नाही तर निर्माता देखील आहे. या सिनेमात दिपिका अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हाव्हर लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारत आहे. या सिनेमात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे. दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये विक्रांतचा लूक आलोक दीक्षितच्या लूकशी मिळता जुळता आहे. विक्रांत आणि दीपिका पहिल्यांदाच या सिनेमात स्क्रीन शेअर करत आहे.

https://www.instagram.com/p/Bt0BNrYA0dz/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

Share