संजय लीला भन्साळी आणि प्रियांका चोप्रा ‘गंगूबाई’ सिनेमासाठी एकत्र येणार

By  
on  

बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमांची. संजय सलमान आणि आलिया यांना घेऊन एक रोमॅंटिक सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. पण आता आणखी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे संजय लीला भन्साळी ‘गंगूबाई’ नावाचा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत असणार आहे. प्रियांकाने या प्रोजेक्टचा हिस्सा बनावं यासाठी भन्साळी प्रयत्नशील आहेत. प्रियांकाने या आधी भन्साळींसोबत ‘बाजीराव मस्तानी’मध्ये काम केलं होतं.

https://www.instagram.com/p/BvNhwU9HFJB/?utm_source=ig_web_copy_link

यावर बोलताना भन्साळी म्हणाले, ‘या सिनेमाची कथा मला खुपच आवडली आहे. बराच काळ मी या कथेवर विचार करत आहे. त्यामुळे हा सिनेमा बनवण्यासाठी मी उत्सुक आहे.’ प्रियांका ब-याच काळानंतर भन्साळींसोबत काम करताना दिसेल.

Recommended

Share