माझा लोकसभा निवडणूक लढवण्याचा कोणताही इरादा नाही : सलमान खान

By  
on  

निवडणुका जवळ आल्या की सिनेकलाकार एखाद्या पक्षात प्रवेश करताना दिसतात किंवा एखाद्या पक्षाचे स्टार प्रचारक बनतात. पण सुपरस्टार सलमानने राजकारणात प्रवेश करण्याचा किंवा आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा कोणताही इरादा नसल्याचं बोलून दाखवलं आहे. सलमानबाबत असं बोललं जात होतं की तो भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पण सलमानच्या उत्तराने या अफवांचं खंडन झालं आहे.

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1108662305921871872

सलमानने सर्वप्रथम पंतप्रधानांचं मतदान करण्याचं ट्वीट रीट्वीट केलं आहे. पंतप्रधानांनी अनेक कलाकारांना जनतेला मतदानासाठी आवाहन करण्याचं सुचवलं होतं. सलमानच नव्हे तर सतत लाईमलाईटमध्ये असलेल्या अनेक कलाकारांबाबत अशा अफवा उठत असतात. मध्यंतरी करीना कपूर खान ही निवडणुक लढवणार असल्याची अफवा समोर आली होती. याशिवाय धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील भारतील जनता पक्षात प्रवेश केला असल्याची बातमी समोर आली होती. पण कालांतराने ही देखील अफवाच ठरली.

Recommended

Loading...
Share