By  
on  

दीपिकाला लक्ष्मी अगरवालच्या लूकमध्ये पाहून, पती रणवीर सिंगची अशी होती प्रतिक्रिया

दीपिकाने सध्या तिच्या आगामी ‘छ्पाक’ या सिनेमावर लक्ष केंद्रित केलं आहे.  दिपिका ‘छपाक’ या सिनेमातून निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सिनेमाचं पोस्टर तिने नुकतंच शेअर केलं आहे. या पोस्टरची दखल अनेकांनी घेतली असून दीपिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दीपिकादेखील हे पोस्टर शेअर करताना  म्हणते, “मी या सिनेमात साकारत असलेली मालती सदैव माझ्यासोबत राहील. आजपासून शुटींगला सुरुवात होतेय.” महत्त्वाचं  म्हणजे हा सिनेमा पुढील वर्षी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.’

दीपिकाच्या या पोस्टरवर रणवीरनेही कमेंट केली आहे. दीपिका छपाकसाठी तू करत असलेले प्रयत्न या लूकमधून दिसून येत आहेत. तुझा हा नवा लूक आणि प्रयत्न कौतुकास्पद आहे. मी लूक पाहून मी खरंच आश्चर्यचकीत झालो आहे. आज मला तूझा अभिमान वाटतोय.’ रणवीर दीपिकाचं कौतुक करताना कधीही थकत नाही. त्याच्या आताच्या पोस्ट मधूनही हेच दिसून येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive