By  
on  

अभिनेत्री रेणुका शहाणे उतरल्या देहविक्रय करणा-या स्त्रियांच्या समर्थानार्थ

अभिनेत्री रेणुका शहाणे स्वत:च्या ठाम मतांसाठी ओळखल्या जातात. आता रेणुका देहविक्रय करणा-या स्त्रियांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. त्यांनी अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्ती यांच्या एका ट्वीट्मध्ये अपराधी आणि देहविक्रय करणा-या स्त्रियांना बरोबरीचं लेखण्याच्या मुद्द्यावर मत जाहिर केलं आहे. रेणुका म्हणतात की देहविक्रय करणा-या स्त्रियांवर लादलेल्या परंपरांमध्ये सुधार करण्याची गरज आहे.

सुचित्रा कृष्णमुर्ती आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘अम्मा नेहमी म्हणायची, पैसा सगळं काही नसतं, गुन्हेगार आणि देहविक्रय करणा-या स्त्रियांही पैसे कमवतात. पैसे महत्त्वाचे नसतात. चरित्र आणि प्रामाणिकपणा देखील खुप महत्त्वाचं आहे. मी आज या शब्दांचा खरा अर्थ समजून घेतला आहे.’

यावर रेणुकाने रिप्लाय केला. ‘सुचित्रा आपल्या आईविषयी कोणताही अनादर नाही. पण महिलांवर होत असलेल्या अन्यायामध्ये सुधार करण्याची गरज आहे. आपण लादलेल्या परंपरामुळे देहविक्रय करणा-या स्त्रियांना कायमच कमी लेखत असतो. पण गुन्हेगारांना आणि या स्त्रियांना एकत्र लेखणं योग्य नाही.’

Recommended

PeepingMoon Exclusive