By  
on  

सलमान खानने सांगितलं दीपिका पदुकोणसोबत काम न करण्याचं कारण

सलमानचा नवीन सिनेमा येणार असला की त्या सिनेमात अभिनेत्री कोण असणार याची चर्चा रंगू लागते. नवोदित अभिनेत्रींना सलमानसोबत चमकण्याची संधी मिळाली की स्वर्ग दोन बोटं उरतो. पण अशा वेळी मात्र बॉलिवूड क्वीन दीपिका पदुकोण मात्र अजूनही सलमानसोबत चमकली नाही. खरं तर दीपिका आणि सलमान बॉलिवूडसाठी ब्लॉकबस्टर जोडी आहे. या दोघांचा सिनेमा सुपरहिट होईल हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नाही. पण असं असलं तरी ही जोडी अजूनही एकत्र न झळकण्याचं कारण सलमानने नुकतंच स्पष्ट केलं आहे.

https://www.instagram.com/p/BvNFYo4AwRU/?utm_source=ig_web_copy_link

सलमान म्हणतो, खरं तर मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. पण आम्ही एकत्र काम करु. खरं तर आजपर्यंत एकत्र कामाची ऑफरच आली नाही. दीपिका एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे माझ्या सिनेमातील व्यक्तिरेखा तिच्या लायकदेखील असायला हवी. सध्या तरी आमच्या जोडीबाबत कोणतीच चर्चा नाही. सलमान सध्या भारत या आगामी सिनेमात व्यस्त आहे. या सिनेमात कतरिना कैफ सलमानसोबत झळकणार आहे.

https://www.instagram.com/p/BtC8uFmgyyr/?utm_source=ig_web_copy_link

 

Recommended

PeepingMoon Exclusive