By  
on  

बॉक्स ऑफिस झालं ‘केसरीमय, सात दिवसात जमवला १०० कोटींचा गल्ला

अक्षय कुमारला हे वर्षं अत्यंत चांगलं जाणार असं दिसत आहे. कारण, त्याचा सिनेमा केसरी कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढत निघाला आहे. अक्षयच्या सिनेमाने सात दिवसातच १०० कोटींचा पल्ला पार केला आहे. अक्षयचा हा सिनेमा या वर्षातील सगळ्यात वेगवान कलेक्शन करणारा सिनेमा ठरला आहे. 36 व्या शीख रेजिमेंटचं 12 सप्टेंबर 1897 साली 21 सैनिक आणि 10 हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धाची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आता केसरीच्या निमित्ताने सर्वांसमोर उलगडली आहे.

केसरी’ ने दुस-या दिवशी १६.७५ कोटी, शनिवारी १८.७५ कोटी, रविवारी २१.५१ कोटी, सोमवारी ८.२५ कोटी, मंगळवारी को ७.१७ कोटी, आणि सातव्या दिवशी बुधवारी ६.५२ कोटी इतका गल्ला जमवला आहे. केसरीचा हा विक्रम आगामी काळात कोणता सिनेमा मोडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
हे युद्ध १२ सप्टेंबर १८९७मध्ये लढलं गेलं होतं. इतिहासातील मोठया लढायांपैकी एक असलेल्या या लढाईचा स्मृतिदिन ब्रिटनमध्येही साजरा केला जातो. पण भारतात याची दख़ल आता घेतली गेल्याचंही अक्षय नमूद करतो.

Recommended

PeepingMoon Exclusive