उर्मिलाची राजकीय कारकिर्द सुरु, मुंबईत पोहोचताच मोदींवर साधला निशाणा

By  
on  

काँग़्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उर्मिला मांतोडकरने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेसी विचारधारेप्रमाणे चालणार असल्याचे तिने या प्रचारातून स्पष्ट केलं आहे. आपल्या पहिल्या वहिल्या भाषणातून तिने पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

https://twitter.com/OfficialUrmila/status/1110856046782959617

उर्मिला म्हणते, मोदी देशाची फसवणुक करत आहेत. मोदींच्या कारकिर्दीत जनतेच्या मनात भय आहे. मी एक कलाकार आहेच पण एक जागरुक महिलाही आहे. देशाची नागरिक असल्याच्या नात्याने काही चुकिचं घडत असेल तर त्याबद्द्ल मला आवाज उठवलाच पाहिजे. मी लोकांच्या प्रेमामुळेच इथेपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्यांच्या भल्यासाठी मी कटिबद्ध आहे. मला राहुल गांधींची विचारधारा आवडते, त्यामुळेच या पक्षात प्रवेश केला आहे.’

https://twitter.com/OfficialUrmila/status/1111202845221679106

राजकीय पक्षांकडून निवडणूका आणि सेलिब्रिटी हे नवं समिकरण सध्या जुळवताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक पक्षाची सेलिब्रिटींना पक्षात खेचून आणण्याची जणू चढाओढच लागलीय. उर्मिलाचा काँग्रेस प्रवेश हा त्याचा परिपाक म्हणता येईल. उर्मिलाने काल  राहुल गांधीकडून सत्कार स्विकारत काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर आज मुंबईत आल्यावर हे भाषण केलं आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share