माधुरी नाही करणार राजकारणात प्रवेश, अभिनयातील करीअर वर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा

By  
on  

माधुरी दीक्षित सध्या तिच्या सिनेमांमुळे चर्चेत आहेच. पण सध्या चर्चा रंगलीये ती माधुरीच्या राजकारण प्रवेशाची. अभिनेत्री उर्मिला मांतोडकरनंतर माधुरी राजकारणात प्रवेश करणार का याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. पण माधुरीने राजकारण प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली आहे. माधुरीने सध्या राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही इरादा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘टोटल धमाल’ च्या यशाचा आस्वाद घेतल्यानंतर माधुरी आगामी ‘कलंक’साठी सज्ज झाली आहे. माधुरीच्या ‘कलंक’ लूकची चर्चा सिनेमा रिलीज होण्यापुर्वी पासूनच सुरु आहे. याशिवाय माधुरी तिचा आगामी सिनेमा १५ ऑगस्ट ला प्रमोट करण्यातही व्यस्त आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. २९ मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Recommended

Loading...
Share