By  
on  

दीपिका रणवीरची ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का? दिसली लग्नानंतरची समंजस केमेस्ट्री

दीपिका रणवीर हे कपल जाईल तिथे प्रसिद्धी मिळवत असतात. त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पहात असतात. दीपवीर नुकतेच एका अ‍ॅडमध्ये झळकले आहेत. या दोघांनी एका एअर कंडिशनरची अ‍ॅड केली आहे.

https://twitter.com/DeepVeer_FC/status/1111955288398147585

या जाहिरातीमध्ये दीपिका नखं फायलिंग करत असते. रणवीर तिच्या शेजारी बसून सांगतो की लग्न केल्यानंतर तो किती खुश आहे. याउलट बॉयफ्रेंड असताना कितीतरी कर्तव्य पार पाडावी लागायची, जसं की रोज गुड मॉर्निंग किंवा गुड नाईटचे मेसेज कर, काळजी घ्या. पण लग्न झाल्यापासून या जबाबदा-या अजिबातच नाहीत. यावर दीपिका रुसुन बेडरुममध्ये जाते. त्यावर रणवीर एसी १८ डिग्रीवर सेट करतो. यावर दीपिकाच्या रागाचा पारा चटकन उतरतो. त्यावेळी रणवीर म्हणतो, मला माझ्या जबाबदा-या माहीत आहेत. यावर दीपिका खुश होत म्हणते, बरं झालं आपलं लग्न झालं. या अ‍ॅडवर प्रेक्षकांच्या लाईक्सच्या वर्षाव होत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive