By  
on  

‘सेक्रेड गेम्स’ मधला बंटी खेळणार क्रिकेट, ‘83’मध्ये लागली वर्णी

दिग्दर्शक कबीर खान त्यांच्या आगामी ‘83’ या सिनेमाच्या कास्टींगमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच त्यांना यशपाल शर्मांची व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार मिळाला आहे. ‘सेक्रेड गेम्स’पासून प्रसिद्धीस आलेला जतीन सरना यशपाल यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. जतीन याने यापुर्वी सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमध्ये बंटीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

https://twitter.com/83thefilm/status/1113008190197624832

’83’ या सिनेमात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला विश्वचषक जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला जात आहे. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या सिनेमात कपिलदेवची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे. यात कृष्णम्माचारी श्रीकांत यांची व्यक्तिरेखा दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. विकेटकीपर सय्यद किरमानी यांची व्यक्तिरेखा युट्युब स्टार साहिल खट्टर साकारणार आहे. तर संजय पाटील यांची व्यक्तिरेखा चिराग पाटील साकारणार आहेत.  याशिवाय अभिनेता आदिनाथ कोठारे या सिनेमात दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive