By  
on  

विकी—कतरिना बनले आहेत बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल, संपणार कतरिनाचा एकटेपणा?

बॉलिवूडमध्ये कधी कुणाच ब्रेक अप होईल आणि कुणाचं लिंक अप होईल हे सांगता येत नाही. आता विकी कौशलचंच पाहा ना, हरलीन सेठीसोबत ब्रेकअपच्या बातम्या  सध्या चर्चेचा विषय आहेत. त्यासोबतच चर्चेत आहे विकी आणि कतरिनाची मैत्री. विकी आणि कतरिना यांच्यात नक्की काय चाललंय याचं गॉसिप सध्या बॉलिवूडमध्ये जोरात आहे. ही जोडी अजूनतरी एकत्र काम करण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. तरीही अ‍ॅवार्ड शो आणि चॅट शोमध्ये हे दोघंही एकमेकांचं कौतुक करताना दिसतात. विकी कौशल आणि अभिनेत्री हरलीन सेठी रिलेशनशीपमध्ये असल्याचं नुकतंच समोर आलं होतं. पण त्यानंतर लगेच त्यांच्या ब्रेक अपच्या बातम्याही झळकू लागल्या. याचदरम्यान कतरिनाने विकी कौशल सोबत आपली ऑनस्क्रीन जोडी चांगली दिसेल असं विधान केलं.

‘कतरिना आपल्याला ओळखते याचं आश्चर्य वाटल्याचंही विकीने कबूल केलं होतं. त्यानंतर एका अ‍ॅवार्ड शोमध्येही कतरिनासाठी विकीने ‘मुझसे शादी करोगी’ हे गाणं म्हटलं त्यावेळीही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याचवेळी कतरिनादेखील ‘हाऊज द जोश’ची घोषणा देताना ब्लश करत होती. त्यामुळे हे दोघं आगामी लव्हबर्डस तर नाही ना अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive