By  
on  

इरफानने भारतात परतल्यानंतर मानले चाहत्यांचे आभार, ट्वीटमधून व्यक्त केल्या भावना

अभिनेता इरफान खान आता आजारावरील उपचार घेऊन भारतात परत आला आहे. इरफानचा परदेशातील उपचार संपला असून तो भारतात परतला आहे. इरफानला न्युरोएण्डोक्रान्युरोएण्डोक्राईन कॅन्सरची लागण झाली होती. दुर्मिळ असलेल्या या कॅन्सरवर इरफान परदेशी उपचार घेत होता. पण इरफ़ान सध्या परतला आहे. तो परतल्यानंतर इंग्लिश मीडियम २च्या शुटींगला सुरूवात करणार असल्याचं समजलं आहे.  या सिनेमाचं प्री प्रॉड्क्शन सुरु झालं असून एप्रिलमध्ये सिनेमा फ्लोअरवर जाईल.

https://twitter.com/irrfank/status/1113333655538208768

नुकतंच त्याने एक ट्वीट करत आजारपणात त्याच्या मागे उभं राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. या ट्वीटमध्ये इरफान म्हणतो, ‘जिंकण्याच्या प्रयत्नात कुठेतरी आपण स्वत:वर प्रेम करणं विसरून जातो. मात्र कठीण प्रसंगात आपल्याला त्याची जाणीव होते. मी माझ्या आयुष्याच्या या वळणावर मला मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि प्रार्थनेमुळे मी लवकर बरा होऊ शकलो’. इरफान नुकताच विमानतळावर स्पॉट झाला विशेष म्हणजे त्याने मागील वेळेसारखा यावेळी चेहरा अजिबात लपवला नाही. उलट तो आत्मविश्वासाने कॅमे-यांना सामोरं जात असल्याचं दिसत होतं. इरफान परत आल्याने त्याचे चाहते मात्र खुश झाले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive