By  
on  

भावनिक गुंत्यात अडकलेल्या नात्यांची गोष्ट दिसतीये ‘कलंक’च्या ट्रेलरमध्ये

प्रेमाचे धागे कितीही नाजूक असले तरी त्यांचा गुंता मात्र न सुटणारा असतो. असंच काहिसं चित्र आहे ‘कलंक’चं. करण जोहरच्या आगामी बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘कलंक’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिषेक वर्मा दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर यांचा अभिनय पहायला मिळेल.

https://www.youtube.com/watch?v=p4Z_ueeT_XQ

या सिनेमात आदित्य, सोनाक्षी आणि आलिया यांच्यातील प्रेमत्रिकोण पहायला मिळत आहे. या त्रिकोणात आणखी एक दुवा जोडला जातो तो वरुण धवनच्या रुपाने. आलियाच्या मनाविरुद्ध झालेल्या लग्नानंतर आणि पती पत्नीमधील दुराव्यानंतर ती जफर म्हणजेच वरुणच्या प्रेमात पडते खरी पण या नात्याला यश मिळतं का हे मात्र सिनेमात दिसेल. एका दृश्यात माधुरी आणि कियाराचं दर्शनही घडतं. एकंदरीत भव्य सेट आणि एकापेक्षा एक सरस अशा लावण्यवतींचा भरणा असलेला हा ट्रेलर रसिकांना आवडेल यात शंका नाही.

 

Recommended

PeepingMoon Exclusive