By  
on  

रणवीर सिंगने ‘83’च्या टीमसोबत धमाल करतानाचा हा फोटो केला शेअर

ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83’.ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83’. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमचा बायोपिक आहे. विशेष म्हणजे यात कपिल देवची व्यक्तिरेखा रणवीर सिंग साकारणार आहे.

https://www.instagram.com/p/Bvyl0JaBSKj/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमासाठी रणवीर आणि ऑनस्क्रीन टीम १० दिवसांसाठी धर्मशाला येथे आली आहे. त्यानंतर ही टीम १०० दिवसांसाठी लंडन आणि स्कॉटलंड येथेही शुटिंगसाठी जाणार आहे. धर्मशालामध्ये शुटिंग, सराव तर सुरु आहेच याशिवाय टीममेट्सची मस्ती देखील सुरु आहे. याचा फोटो नुकताच रणवीरने शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रणवीर म्हणतो, ‘कपिलचे योद्धे धर्मशालाला पोहोचले आहेत, !! it’s on!!! @83thefilm @kabirkhankk.” रणवीरशिवाय या सिनेमात आर बद्री, हैर्र्डी संधू, चिराग पाटील, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, ताहिर भसीन, एमी विर्क आणि साहिल खट्टर, आदिनाथ कोठारे हे कलाकार आहेत.

या शिवाय एका सेल्फीमध्ये चिराग पाटील, साकिब सलीम, आदिनाथ कोठारे आणि रणवीर सिंग यांचाही मस्ती करण्याचा अंदाजातील सेल्फी दिसत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive