By  
on  

अजय देवगणचा हा सिनेमा येणार अ‍ॅनिमेटेड स्वरुपात, लहान मुलांसाठी बनणार शो

अजय देवगणच्या यादगार सिनेमांचा उल्लेख गोलमालशिवाय अपुर्ण आहे. गोलमाल फ्रॅंचाईजीने अजयला विनोदी अभिनेता म्हणून प्रस्थापित केलं. गोलमालमध्ये अजयसोबत अरशद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कुणाल खेमु यांच्या भूमिका होत्या. या सिनेमाने रसिकांना खळखळून हसवलं. आता हा सिनेमा अ‍ॅनिमेशनच्या स्वरुपात सादर केला जाणार आहे. लहान मुलांसाठी असलेल्या ‘सोनिक’ या चॅनेलवर हा अ‍ॅनिमेटेड शो दाखवला जाणार आहे. ‘गोलमाल ज्युनिअर’ असं या कार्यक्रमाचं नाव असेल.

मुंबई मिररच्या सुत्रांनुसार दोन खोडकर ग्रुपवर गोलमाल ज्युनिअर हा शो बेतला असेल. मे मध्ये सुट्ट्यांची वेळ साधून हा शो प्रसारित केला जाणार आहे. या पुर्वी अजयच्या ‘सिंघम’ या सिनेमाचाही ‘लिटील सिंघम’ या नावाने अ‍ॅनिमेटेड शो बनला होता. या शोच्या निर्मितीमध्ये दिग्दर्शक रोहीत शेट्टीचाही सक्रिय सहभाग असणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive