'स्टुडंट ऑफ द इयर'चं हे नवीन पोस्टर तुम्ही पाहिलंत का?

By  
on  

पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ ची सर्वत्र प्रचंड चर्चा रंगलीय. काल सिनेमातील  प्रमुख कलाकार टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे ह्यांचे लूक उलगडल्यानंतर आता या सिनेमाचं आणखी एक नवीन पोस्टर नुकतंच प्रेक्षकांसमोर आलं आहे. हे नवं कोरं पोस्टर करणने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत,"# बॅचचऑफ2019 लवकरच येतेय", आणि आज ह्या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलरसुध्दा उलगडेल असं म्हटलंय.

https://www.instagram.com/p/BwI81qlpGsW/?utm_source=ig_embed

या सिनेमाच्या पहिल्या भागात आलिया भट, वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांनी पहिल्या भागातून प्रेक्षकांची मनं जिकल्यानंतर आता एक फ्रेश स्टारकास्ट या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमात टायगर श्रॉफसोबतच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोन नवोदित अभिनेत्री पदार्पण करत आहेत.

येत्या 10 मे रोजी 'स्टुडंट ऑफ द इयर 2' हा करण जोहरची निर्मिती असलेला फ्रेश सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share