By  
on  

सिनेमातल्या किसींग सीन्स आणि इंटिमेंट सीन्सवर सलमान खानचं हे आहे, मत

आपण नेहमीच सिनेमांमधून किसींग सीन्स आणि थोडे तरी इंटिमेंट सीन्स पाहतो. कधी कथानकाची गरज म्हणा किंवा कधी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ह्या ट्रीक्स वापरल्या जातात. अनेक मोठमोठ्या कलाकारांना आपण असे सीन्स देताना आत्तापरयंत पाहिलंय. पण बॉलिवूड भाईजान आणि सुपरस्टार सलमान खान मात्र नेहमीच अशा सीन्सपासून लांब राहताना पाहायला मिळालाय आणि जास्तीत अॅक्शन व भरपूर धम्माल यावर तो भर देतो पण यामागचा खुलासा नुकताच त्याने एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना केला आहे.

सलमान खान म्हणतो, "किसींग सीन्स आणि इंटिमेंट सीन्स असलेले सिनेमे संपूर्ण कुटुंबासोबत पाहताना फारच अवघडल्यासारखे होते. त्यामुळे माझ्या प्रोडक्शनच्या सिनेमांमध्ये असे सीन्स असणार नाहीत, याची मी कटाक्षाने काळजी घेतो. बाकी माझ्या सिनेमांमध्ये अॅक्श, प्रेम, विनोद हे सर्व खच्चून भरलेले तुम्ही पाहिलं असेलच."

या मुलाखतीत सलमानने स्वत:ला उत्तम अभिनेता नसल्याचंही म्हटलं. ‘माझ्यापेक्षा शाहरुख खान आणि आमिर खान दमदार अभिनेते आहेत. नेहमीच त्यांचा परफॉर्मन्स उत्तम असतो. माझ्याबाबतीत असं घडत नाही. माझ्यात जेमतेम अभिनय कौशल्य आहे आणि नशीबामुळे मी या इंडस्ट्रीत टिकतोय,’ असं तो पुढे म्हणाला.

 

Recommended

PeepingMoon Exclusive