By  
on  

जयललितांच्या दुस-या बायोपिकसाठी दिग्दर्शकांची काजोलला पसंती?

सध्या राजकिय क्षेत्रातील व्यक्तींवर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड आला आहे. तामिळनाडूच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचा बायोपिक बनणार असल्याची बातमी काही दिवसांपुर्वी प्रकाशझोतात होती. या बायोपिकसाठी कंगना राणावत हिची निवड झाल्याचंही बोललं जात होतं. तामिळमध्ये ‘थलायवी’ आणि ‘हिंदी’साठी ‘जया’ असंदेखील ठरलं होतं.

https://twitter.com/sri50/status/1114741853436305410

पण आता जयललिता यांच्या जीवनावर आणखी एक बायोपिक बनणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात काजोल जयललिता यांच्या भूमिकेत दिसेल. ‘शशिलता’ असं या सिनेमाचं नाव असेल. या सिनेमाचं दिग्दर्शन जगदीश्वर रेड्डी करणार आहेत. जयललिता यांच्या सहाय्यक शशिकला यांच्या भूमिकेत अमला पॉलच्या नावाचा विचार होत आहे. काजोलचं नाव या सिनेमासाठी नक्की झालं तिचा हा पहिलाच बायोपिक असेल. जगदीश्वर रेड्डींनी या सिनेमाचं पोस्टर देखील रिलीज केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive